
अलीकडच्या काळात शहरीकरणाचा वेग वाढत असताना अनेक जण गुंतवणुकीसाठी ग्रामीण भागातील किंवा ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करत आहेत. कमी दरात अधिक भूखंड मिळतो आणि भविष्यात त्या भागाचा विकास होण्याची शक्यता असते. मात्र ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करताना विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा गुंतवणुक योजनेत फसवणूक कोणाची दाट शक्यता असते.
ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्याल.
- जमीनचा प्रकार तपासा:-
ग्रामपंचायत हद्दीतील अनेक जमिनी या शेती योग्य (बागायतदार/जिरायत) असतात. अशा जमिनीवर घर बांधणी करता येईल की नाही हे पाहण्यासाठी ती जमीन ‘एन – ए ‘(non agricultural) करण्यात आली आहे का, हे तपासणी गरजेचे असते.
7/12 उतारा व फेरफार नोंदणी
जमिनीचा सातबारा उतारा व त्यावर झालेल्या फेरफारांची माहिती (८- अ) तपासा. त्यावर मालकाचे नाव, क्षेत्रफळ, आणि कोणतेही बंधन आहे का, याची माहिती मिळते.
जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट आहे का?
जमीन विकणारा व्यक्ती खरा मालक आहे का, त्याचा वारस हक्क आहे का, हे महत्त्वाचे आहे. कुणी तिसऱ्या पक्षावरून किंवा वकिली मार्फत जमीन विकत असेल, तर त्याचे अधिकृत अधिकार आहेत का, हे तपासणी गरजेचे आहे.
गाव नमुना ८- अ व फेरफार फार्म तपासावा
ही कागदपत्रे शेत जमिनीच्या व्यवहारातील आवश्यक बाबी दाखवतात. फेरफार नोंदी तक्रारी किंवा वाद आहेत का, हे बघणं गरजेचं आहे.
भूमापन (मोजणी) अहवाल तपासा
जमीन मोजणी झाली आहे का? जमिनीच्या सीमारेषा स्पष्ट आहेत का, यासाठी भूमापन खात्याचा अधिकृत नकाशा आणि अहवाल तपासावा.
बांधकाम परवानगी किंवा एन – ए ऑर्डर आहे का?
जर तुम्ही घर/फार्म हाऊस बांधण्याचा विचार करत असाल, तर ती जमीन एन – ए आहे का, हे तपासावे. बांधकामासाठी ग्रामपंचायत किंवा तालुका पातळीवर मिळालेली परवानगी आहे का, हे बघणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायतचे ना हरकत सर्टिफिकेट (no objection certificate)
काही प्रकरणांमध्ये ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणे आवश्यक असते, विशेषतः पाणी, रस्ता, वीज जोडणी साठी.
आवश्यक कागदपत्रांची यादी
- 7/12 उतारा (सातबारा)
- ८- अ उतारा
- फेरफार उतारे
- जमीन मालकीचा दाखला
- जमीन मोजणी नकाशा
- एन – ए आदेश(जर बांधकामासाठी असेल तर)
- विक्री करारनामा(sale deed)
- ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
- वारसा हक्क प्रमाणपत्र(जर वारसदारांकडून विक्री होत असेल तर)
- टॅक्स पावते आणि पाणी/वीज बिलांची पावती
दरम्यान, ग्रामपंचायत हद्दीतील जमीन खरेदी करताना केवळ भाव किंवा क्षेत्रफळ पाहून निर्णय घेऊ नये. सर्व कायदेशीर कागदपत्रांची पडाताळणी करून, स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन जमीन खरेदी करावी.