
भारत हा कृषीप्रधान देश आहे. आणि भारतात मोठ्या प्रमाणात लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे. विशेषतः कोरोना काळात महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला कृषी आणि कृषी पूरक व्यवसायाचा मोठा आधार मिळाला होता. अनेक ठिकाणी शेतकरी असल्याचा दाखला विविध कामांसाठी आवश्यक असतो. त्यामुळे शेतकरी प्रमाणपत्र काय असते, कुठे मिळतं? आणि त्याचा उपयोग कोणत्या कामासाठी केला जातो? याची माहिती घेणं अत्यंत गरजेचं असतं.
शेतकरी प्रमाणपत्राचा उपयोग कोठे होतो?
शेतकरी प्रमाणपत्रामुळे कृषी शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेताना लाभ मिळतो. शिवाय जमीन खरेदी करताना देखील हे प्रमाणपत्र सादर करावे लागते. काही शासकीय योजनांमध्ये ही शेतकरी म्हणून मिळणाऱ्या सवलतीसाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असतं.
शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळतं?
हे प्रमाणपत्र दोन ठिकाणी उपलब्ध आहे. तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार पोर्टलवर दोन्हीपैकी तुमच्यासाठी जे अधिक सोयीचं असेल, त्या पद्धतीने अर्ज करून हे प्रमाणपत्र मिळवता येतं.
शेतकरी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा:-आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, शासकीय ओळखपत्र.
पत्त्याचा पुरावा:-आधार कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, मतदान कार्ड, वीज किंवा पाणी बिल, घरफाळा पावती, सातबारा उतारा किंवा ८ अ उतारा.
इतर कागदपत्रे:-शेतकरी असल्याचा सातबारा किंवा ८ अ उतारा स्वयंघोषणापत्र हे अनिवार्य असतं. वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर साधारण पंधरा दिवसांच्या आत प्रमाणपत्र मंजूर होत.
आपले सरकार पोर्टल वर अर्ज कसा करावा?
- आपले सरकार वेबसाईटवर नवीन वापर करता नोंदणी करा. नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरून लॉगिन तयार करा.
- लॉगिन झाल्यानंतर डॅशबोर्ड वर महसूल विभाग निवडा.
- पुढे महसूल सेवा आणि त्यानंतर शेतकरी प्रमाणपत्र पर्यायावर क्लिक करा.
- नवीन विंडोमध्ये आवश्यक कागदपत्रांची यादी वाचून घ्या आणि ती तयार ठेवा.
- अर्जात वैयक्तिक माहिती, पत्ता आणि किती वर्षापासून त्या पत्त्यावर राहता ही माहिती भरा.
- कागदपत्र 75 kb ते 500 केबी साहिज मध्ये स्कॅन करून अपलोड करा. फोटो व सही अपलोड करा.
- अर्ज सादर करून शुल्क ऑनलाईन भरावे. पावती सेव करून ठेवा.
प्रमाणपत्र किती दिवसात मिळेल?
सर्व कागदपत्र आणि अर्ज योग्य असल्यास पंधरा दिवसांच्या आज शेतकरी प्रमाणपत्र मिळेल. जर काही कारणांमुळे प्रमाणपत्र मिळालं नाही, तर आपले सरकार पोर्टलवर लॉगिन करून पुन्हा अर्ज करता येईल.
Leave a Reply