
शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नवीन माहिती ई – पीक पाहणी बाबत देण्यात आलेली आहे, अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की, एक रुपयात पिक विमा योजना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना ई – पीक पाहणी करावी लागणार की नाही? व याबाबतच ई – पीक पाहणी कशी करावी त्याच पद्धतीने कोणत्या प्रकारच्या सुविधा शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत अशा एक ना अनेक समस्यांची माहिती आपण घेऊया,
शासनाच्या माध्यमातून 27 जून 2025 रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना 2025 मध्ये आता खरीप हंगामासाठी ई – पीक पाहणी करावी लागणार आहे, ई – पीक पाहणी DCS या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केली जाणार आहे, परंतु हंगामासाठी ई – पीक पाहणी करावी लागणार आहे, तसेच यामध्ये एक मोठा प्रश्न म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसणे व असला तरी ई- पीक पाहणी कशी करावी? याबद्दलची माहिती नसणे या अशा अनेक कारणांमुळे सर्व शेतकरी ई – पीक पाहणी करू शकत नाहीत. काही शेतकरी ई – पीक पाहणी करतात परंतु ज्या शेतकऱ्यांना याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नसते, असे शेतकरी ई – पिक पाहणी पासून वंचित असतात त्यामुळे शासनाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची ई – पीक पाहणी करण्यासाठी तलाठ्यासोबत एक सहाय्यक नेमले जातात, व त्यांच्या माध्यमातून गावातील जे क्षेत्र ई – पीक पाहणी पासून वंचित आहे, अशा क्षेत्राची ई – पिक पाहणी केली जाते, व त्या सहाय्यकांना प्रति प्लॉट दहा रुपये प्रमाणे मानधन करण्यात येणार आहे, त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई – पीक पाहणी करणे शक्य नाही असे शेतकरी सहजरित्या सहायकाच्या माध्यमातून ई – पीक पाहणी करू शकतात. त्यामुळे अशा प्रकारची ही महत्त्वाची बाब शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे आत्ता 100% शेतीवरील ई- पीक पाहण्याची नोंद करता येणे शक्य होणार आहे. अशाप्रकारे शासनाच्या माध्यमातून जीआर काढण्यात आलेला आहे.
Leave a Reply