
agriculture news:-खरीप हंगाम मुख्यतः पावसाळ्याच्या कालावधी येतो. या काळात पिके उभ्या अवस्थेत असतात आणि विविध प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी फवारणी करणे शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक असते. परंतु चुकीच्या पद्धतीने फवारणी केल्यास शेतकरी, पिके आणि पर्यावरण यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. म्हणूनच फवारणी करताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
फवारणीची तयारी
योग्य कीटकनाशकांची निवड:-पीक कोणते आहे? त्यावर कोणती कीड व किंवा रोगाचा प्रादुर्भाव आहे? याचे अचूक निदान करूनच योग्य कीटकनाशक निवडावे. तज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्र किंवा कृषी विद्यापीठ यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरते. कीटकनाशकाचे प्रमाण कंपनीच्या सूचनेनुसारच फवारणीचे प्रमाण ठरवावे. अधिक औषध घालून कीड लगेच मिरेल हा गैरसमज शेतकऱ्यांनी करून घेऊ नये.
फवारणीसाठी योग्य वेळ
फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी. उन्हात फवारणी केल्यास औषधाची प्रतिक्रिया बदलू शकते आणि वनस्पतींना हानी पोहोचू शकते. पावसाची शक्यता असल्यास फवारणी करू नये कारण औषध पाण्यामुळे वाहून जाऊन त्याचा उपयोग होणार नाही.
योग्य उपकरणाचा वापर
फवारणी करताना स्प्रे पंप नीट तपासून घ्यावा. लिकेज, नळीतील अडथळे काढून टाकावेत. फवारणी करताना औषधाचे थेंब बारीक व समान पद्धतीने सर्व झाडावर पडतील याची काळजी घ्यावी.
व्यक्तिगत व पर्यावरणाची काळजी घ्यावी.
फवारणी झाल्यानंतर हात पाय नीट स्वच्छ धुवावेत. कपडे बदलावेत. फवारणीचे अवशेष पानवट्याजवळ किंवा जनावरांच्या संपर्कात येईल अशा ठिकाणी ठेवू नयेत. औषधांचे डबे, औषधाच्या बाटल्या योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावावी.
फवारणी नंतरची निरीक्षणे
फवारणीनंतर 3 ते 5 दिवसात परिणामाची पाहणी करावी. गरज असल्यास पुढील फवारणीचे नियोजन करावे. एका फवारणीतच समाधान मिळेल असा समज न ठेवता, कीड रोगाचे प्रमाण लक्षात घेऊन आवश्यक तितक्या वेळा फवारणी करावी.
Leave a Reply