खाजगी सावकरकीच्या विळख्यातून शेतकऱ्यांची आता होणार सुटका, राज्य शिखर बँकेचा एक महत्त्वकांक्षी व मोठा निर्णय!

Maharashtra Shikhar Bank:- राज्यातील अडचणीत आलेल्या जिल्हा सहकारी बँकांमुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला होता. अनेक ठिकाणी प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना कर्जपुरवठा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकारकिकडे वळावे लागत होते.

सध्याची स्थिती लक्षात घेऊन राज्य शिखर बँकेने एक महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. यानुसार, आता अशा जिल्ह्यातील सोसायट्यांना थेट कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शिखर बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे.

20 जिल्ह्यातील बँका अडचणीत, सोसायटी अडकल्या

सध्या राज्यात 31 जिल्हा सहकारी बँका कार्यरत असल्या तरी त्यातील 20 बँका डबघाहीस आलेल्या आहेत. यामध्ये नाशिक, नागपूर, वर्धा, बीड, बुलढाणा, सोलापूरसह अनेक बँकांचा समावेश आहे. या बँकांच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना मागील काही काळात नियमित कर्ज पुरवठा झाला नाही. परिणामी, शेतकरी खाजगी सावकारांच्या तावडीत सापडत आहेत. हे सावकार अवस्तव्य व्याजदराने कर्ज देतात आणि कर्ज न फेडल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक व मानसिक ताण नर्माण होतो.

शिखर बँकेकडून थेट कर्ज पुरवठ्याचा निर्णय

या पार्श्वभूमीवर, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक्षेपानंतर शिखर बँकेने पुढाकार घेतला. बँकेचे प्रशासक अनास्करी यांनी सांगितले की, अशा अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना शिखर बँक थेट कर्ज पुरवणार आहे. या निर्णयाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, केंद्र सरकारकडे प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.

कर्जपुरवठ्यासाठी काही अटी व शर्ती

अनासकर यांनी स्पष्ट केले की, कर्ज देताना काही निकष ठेवण्यात आले आहेत. संबंधित संस्था गेल्या तीन वर्षांमध्ये नफ्यात असाव्यात, तिचे एकूण उत्पादक कर्ज (NPA) दहा टक्के पेक्षा कमी असावे आणि ती आर्थिक दृष्ट्या सक्षम असावी. अशा संस्थांनी आपली कर्ज मागणी शिखर बँकेकडे नोंदवावी. निधीच्या पुरवठ्यावर कोणतेही बंधन नसेल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील सहकार व्यवस्थेचा आढावा

  • एकूण प्राथमिक कृषी सहकारी संस्था:- २१,०००
  • खरीप हंगामातील कर्जपुरवठा:-१८,००० कोटी रुपये
  • रब्बी हंगामातील कर्जपुरवठा:- ५ ते ६हजार कोटी रुपये
  • राज्यातील परवानाधारक सावकारांची संख्या:- १०,०००

शेतकऱ्यांना दिलासा

या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरीप हंगाम चालू असतानाच वेळेवर निधी उपलब्ध झाल्यास शेतीची कामे सुरळीत होतील. सावकारांच्या जाचातून मुक्तता होऊन शेतकरी आत्मनिर्भरतीकडे वाटचाल करू शकतील. विशेष म्हणजे, शिखर बँकेने या योजनेच्या तातडीने अंमलबजावणीला सुरुवात केली असून, 20 जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांनी शिखर बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *