
cow news:-देशी गाईंच्या संवर्धनाशिवाय शेतीचा आणि मातीचा पोत सुधारूच शकत नाही. हेच सांगण्यासाठी पुण्यात ‘देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’मोठ्या उत्साहात साजरा झाला. देशी गोवंश संवर्धनासाठी काम करणाऱ्या शेतकरी आणि संस्थांचा सन्मान करून गोसेवा आणि नैसर्गिक शेतीच्या महत्वावर भर देण्यात आला.
गाईला राजमाता आणि गोमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. राज्यातील एक हजार 37 पैकी 960 गोशाळा गोसेवा आयोगाकडे रजिस्टर आहेत. देशी गोवंश संवर्धनासाठी गोसेवा आयोग कटिबद्ध आहे. “असे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले.
देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त पुणे कृषी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या सप्ताहाची सांगता 22 जुलै रोजी करण्यात आली, या कार्यक्रमात ते बोलत होते. देसी गाईंच्या संवर्धनामध्ये चांगले काम करणारे शेतकरी आणि संस्थांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.
देसी गोवंशाचे कृषी संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु, दिवसेंदिवस वाढत्या रासायनिक खतांच्या वापरामुळे माती नापीक होत चालली आहे.
ही माती वाचवण्यासाठी शेतीमध्ये शेन खताचा वापर वाढणे महत्त्वाचे असून त्यासाठी देशी गोवंश वाचवणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने 22 जुलै हा दिवस “देसी गोवंश जतन व संवर्धन दिन”म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आजचा हा दिवस राज्यातील गोशाळेमध्ये साजरा केला जात आहे.
“देशी गाईंचे आणि गोवंशाच संवर्धन होणे शेती क्षेत्रासाठी महत्वाचे असून येणाऱ्या काळात गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि आम्ही राज्यभरात असणाऱ्या गोशाळांना भेटी देऊ आणि देशी गाईचे महत्व समजून घेऊ. असे मत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.
“साधारण 2029 नंतर कोणत्याही उद्योगाची उंची जेवढी असेल तेवढी उंची शेतीची, शेतीमध्ये भविष्य उज्वल आहे, जर नीट व्यवस्थापन केले तर शेती नक्कीच देशी गोवंशाचे संवर्धन कृषी क्षेत्राचा भविष्यासाठी महत्वाचे आहे”असे मत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
गोवंश संवर्धन काळाची गरज
विषजन्य औषधी व खतांच्या अतिवापरामुळे होत असलेले दुष्परिणाम टाळण्याकरिता सेंद्रिय शेती व पंचगव्य औषधे शिवाय पर्याय नाही. त्यामुळे गोवंश संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.
रासायनिक खत
“रासायनिक खतामुळे उत्पादनात वाढ झाली असली, तरी त्याचा दुष्परिणाम मानवी आरोग्य व जमिनीच्या सुपेतेवर निश्चित होत आहे.
गाईपासून उत्पादित होणाऱ्या पंचगव्य औषधी व गो आधारित पदार्थांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईलच शिवाय माणसाला निरोगी राहण्यास मदत होईल.
पंचगव्य औषधावर केलेले संशोधन
पंचगव्य औषधावर केलेले संशोधन नागरिकापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आयुर्वेदिक शास्त्रात पंचगव्य औषधाचे महत्त्व सांगितले आहे.
पंचगवे म्हणजे काय?
गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात.
Leave a Reply