विहीर ही नेहमी वर्तुळाकार म्हणजे गोलच का असते? तुम्हालाही माहीत नसलेलं गुड, याचं खास आहे कारण!

देश, विदेशात जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला विहिरीचा आकार हा वर्तुळाकार म्हणजे गोलच असल्याचा दिसून येईल, पण असं का असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? यामागे आहे खास कारण, तुम्हाला विहिरीचा आकार गोलच असल्याचा दिसून येईल, अर्थात याला काही जुन्या प्राचीन काळातील विहिरी अपवाद देखील आहेत. ज्या चौकोनी आकारात बांधल्यांचं दिसून येतं, मात्र यांचं प्रमाण खूपच कमी आहे, अशा काही विहिरी आपल्याला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये देखील पाहायला मिळतात, चौकोनी विहीर असते आणि त्याच्यामध्ये उतरण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या पायऱ्या बांधलेल्या असतात, हे काही अपवाद वगळता तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला विहिरीचा आकार हा वर्तुळाकार म्हणजे गोलच असल्याचा दिसून येत, विहीर ही कधीच त्रिकोणी किंवा इतर आकाराची असत नाही ती गोलच असते. विहीर गोलच का असते? यामागे नक्की काही कारण आहे का? असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर आज आपण त्याचं उत्तर जाणून घेणार आहोत.

विहिरीची रचना ही गोल आकार ठेवण्यामागे मोठे कारण आहे, गोल आकाराची कोणती वस्तू ही खूप मजबूत आणि टिकाऊ असते. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या बांधकामाची रचना ही गोल बनवतात तेव्हा त्याच्यावर पाण्याचा आणि मातीचा दबाव सर्व बाजूंना सारखा पडतो तो कुठेच कमी किंवा जास्त होत नाही. त्यामुळे अशी वस्तू ही मजबूत बनते, दीर्घ काळ सुस्थितीत राहते, ते ढासळण्याची शक्यता खूप कमी असते. या उलट तुम्ही चौकोनी, त्रिकोणी इतर कोणत्याही आकाराची विहीर बनवाल तर त्यामध्ये धोका हा असतो की, पाणी आणि मातीचा दबाव हा एकाच बाजूवर अधिक पडण्याची शक्यता असते.

अशा स्थितीमध्ये जेव्हा पाणी आणि मातीचा दबाव एकाच बाजूवर अधिक पडतो, तेव्हा तो भाग खचण्याची शक्यता अधिक असते. तुम्ही जेव्हा विहीर खोदता तेव्हा विहिरीमध्ये पाणी आणि मातीचा दबाव हा सर्वाधिक असतो. तो सर्व बाजूंना सारखा पडावा असा प्रयत्न असतो, त्यामुळे जगात तुम्ही कुठेही गेला तर विहीर तुम्हाला गोलच दिसेल. गोल विहिरीमुळे पाणी आणि मातीचा दबाव हा सर्व बाजूने सारखा पडतो, त्यामुळे विहीर दीर्घकाळ टिकते, या उलट तुम्ही जर विहीर दुसऱ्या आकारात निर्माण केली तर पाणी आणि मातीचा दबाव एकाच भागावर पडण्याची शक्यता असते, त्यामुळे विहिरी या नेहमी गोल आकाराच्याच असतात.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *