
fencing subsidy scheme:-सध्याच्या स्थितीत शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. हवामानात होणारे अचानक बदल, अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान, उन्हाळ्यातील पाणीटंचाई, अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. तसेच त्यासोबतच एक महत्त्वाचा आणि वाढत संकट म्हणजे जंगली प्राणी किंवा भटक्या जनावरांकडून होणारे पिकाचे नुकसान, रानडुक्कर, हरीण, नीलगाय, वानर यांच्यासारखे प्राणी उगवती पिकं खाऊन टाकतात किंवा चिखल करून माती खराब करतात. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपली शेती सुरक्षित ठेवने काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनाने ‘तार कुंपण अनुदान योजना’राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती काटेरी तारांचं कुंपण करण्यासाठी 90% पर्यंत अनुदान मिळते, ते शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करणे व पिकांचे नुकसान रोखणे. शेतकरी आपली शेती अधिक सुरक्षित करू शकतो आणि उत्पन्नातही वाढ होऊ शकते. सरकारकडून शेतकऱ्यांना 2 क्विंटल काटेरी तार, सुमारे 30 लोखंडी खांब आणि इतर जोड साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिलं जातं. विशेष म्हणजे या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना 90% अनुदान थेट मिळतं, म्हणजे शेतकऱ्याला फक्त 10% खर्च स्व:त करावा लागतो.
या योजनेसाठी अर्ज करताना काही अटींचे पालन करणे गरजेचे आहे. जसं की, शेत जमिनीवर कोणताही कायदेशीर वाद नसावा. जमीन अतिक्रमण मुक्त असावी, वन्य प्राण्यांचा नियमित वावर असलेलं छत्र असावं याची ग्राम स्थिती विकास समिती किंवा वन्य समितीच्या संमती पत्राद्वारे पुष्टी व्हावी. याशिवाय, कुंपण केल्याने वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात अडथळा येणार नाही, याची खात्री घेतली जाते. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पंचायत समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज भरावा लागतो. अर्ज विहित नमुन्यात भरून ग्रामविकास अधिकारी किंवा संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावा. अर्जासोबत सातबारा उतारा, गाव नमुना 8 अ, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र (जर मागासवर्गीय शेतकरी असल्यास), इतर मालकांची सहमती असल्यास संमती हक्कपत्र, ग्रामपंचायतीचा दाखला आणि वन्यप्राण्यांच्या उपस्थितीबाबत वन अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे असत. तार कुंपण योजनेचा फायदा घेतल्याने शेतकऱ्याच्या शेतीचा बराचसा भाग सुरक्षित होतो. आणि प्राणी पिकांमध्ये घुसण्याचे प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे उत्पादनात वाढ होते. कुंपण झाल्याने पीके चांगल्या स्थितीत राहतात, मजूर किंवा शेतकऱ्यांना शेतावर सतत लक्ष ठेवावे लागत नाही. अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला असून, शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जात नाही आणि उत्पन्नात सातत्य राहत.
Leave a Reply