
ऊसतोड कामगार योजना संदर्भातील नवीन जी आर आलेला आहे. ही योजना कशा पद्धतीने राबविली जाणार आहे. जाणून घेवुयात या संदर्भातील महिती खालील प्रमाणे.
राज्यमध्ये जवळपास 12 लाख ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याची प्रोसेस लगेच सुरु होणार आहे. लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ अंतर्गत हि योजना राबविली जाणार आहे.
गटाई कामगार योजना
ज्या पद्धतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना ओळखपत्र मिळाले अगदी त्याच पद्धतीने हे ओळखपत्र असणार आहे.
बरेच ऊसतोड कामगार हे मराठवाडा विभागातील आहेत. विशेषत: खालील जिल्ह्यातील ज्यास्त कामगार आहेत.
बीड
अहदनगर
जालना
नांदेड
परभणी
धाराशिव
लातूर
छत्रपती संभाजी नगर
नाशिक
जळगाव
वरील जिल्ह्यातील ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कामासाठी स्थलांतर देखील करतात.
बांधकाम कामगार नोंदणी
ऊसतोड कामगार योजना नोंदणी संदर्भात नवीन जीआर
ऊसतोड कामगार नोंदणी आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी शासनाने एक एजन्सी नियुक्ती केली आहे. या एजन्सीमार्फत सर्व कामगारांची नोंदणी केली जाणार आहे.
शासनाकडून नियुक्त केलेल्या एजन्सीस ऊसतोड कामगार नोंदणी व ओळखपत्र तयार करण्यासाठी प्रति व्यक्ती 175 रुपये खर्च येणार आहे.
असंघटित ऊसतोड कामगारांना संघटित करून त्यांना विविध योजनांचा लाभ देणे हा या योजनेचा हेतू आहे. ऊसतोड कामगारांची नोंदणी झाली आणि त्यांना ओळखपत्र मिळाले की शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळणार आहे.
ऊसतोड कामगार योजना कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार
ऊसतोड कामगारांना लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. त्या योजना खालील प्रमाणे आहेत.
- ऊसतोड कामगारांच्या झोपडीत आग लागली आणि त्यामध्ये त्यांचे साहित्य नष्ट झाले तर अशावेळी कामगारास दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळेल.
- अपघातामध्ये जर ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला तर पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळेल.
- ऊसतोड कामगारांना अपघातामध्ये अपंगत्व आले तर दोन लाख 50 हजार रुपये अनुदान मिळेल
- वैद्यकीय खर्चासाठी 50 हजार रुपये अनुदान मिळेल.
- ऊसतोड कामगाराची बैलजोडी लहान असेल आणि बैलांचा अपघात झाला असेल किंवा त्यांना अपंगत्व आले असेल तर अशावेळी 75 हजार रुपये अनुदान मिळेल.
- बैल जोडी मोठी असेल आणि अपघात किंवा अपंगत्व आले तर एक लाख रुपये अनुदान मिळेल.
अशाप्रकारे ऊसतोड कामगारांना सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
ऊसतोड कामगार योजना अटी आणि शर्ती
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण योजनेचा लाभ केवळ ऊसतोड गाळप हंगाम सुरू असताना लागू राहील. या कालावधीत त्यांना अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरी देखील या योजनेचा लाभ मिळेल.
शासनाच्या अपघातग्रस्त योजनेचा यापूर्वी लाभ घेतला असेल तर अशा अपघातांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनांतर्गत खालील बाबींचा समावेश राहणार नाही.
- नैसर्गिक मृत्यू.
- योजना अंमलबजावणी पूर्वीचे अपंगत्व पात्र ठरणार नाही.
- जाणून बुजून स्वतः जखमी करणे.
- अमली पदार्थ सेवन करून झालेला अपघात.
- बैलगाड्यांची शर्यत.
- जवळच्या लाभार्थ्याकडून झालेला खून.
वरील बाबींचा ऊसतोड कामगार योजनेत समावेश होत नाही.
कोणत्या बाबी योजनेसाठी पात्र आहेत.
- रस्ता किंवा रेल्वे अपघात.
- पाण्यात बुडवून मृत्यू होणे.
- औषधे हाताळताना विषबाधा.
- विजेचा धक्का बसून झालेला अपघात.
- वीज पडून मृत्यू.
- साप चावणे किंवा विंचु दंश.
- जनावरांच्या हल्ल्यामध्ये जखमी होणे.
- बाळंतपणातील मृत्यू.
वरील कारणांमुळे जर अपघात झाला किंवा मृत्यू ओढवला तर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजनेचा लाभ निश्चित मिळू शकतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजना नोंदणी झाल्यावर आणि ओळखपत्र मिळविल्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
- ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र.
- कामगाराच्या मृत्यूचे प्रमाणपत्र.
- ऊसतोड कामगाराचे वारस असल्याबाबत वारसाची नोंद.
- कामगाराच्या वयाचे प्रमाणपत्र.
- स्थळ पंचनामा.
- नुकसान झाल्याचा फोटो.
वरील प्रकारचे कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.योजनेचा लाभ देण्यासाठी वारस म्हणून अपघातग्रस्तांची पत्नी, अविवाहित मुलगी, कामगाराची आई, कामगाराचा मुलगा, कामगाराचे वडील, कामगाराची, किंवा इतर अन्य कायदेशीर वारसदार योजनेचा लाभ घेऊ शकतात.
योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अपघात झाल्यावर प्रस्ताव 30 दिवसाच्या आत जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सह आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयात सादर करावा.
Leave a Reply