
बांधकाम कामगारांना आता नवीन अत्यावश्यक संच ज्याला इसेन्सिअल किट असे देखील म्हटले जाणार आहे. आणि त्यासाठीच महाराष्ट्र राज्य शासनाचा दिनांक 18 जून 2025 रोजी एक नवीन शासन निर्णय अर्थातच जीआर प्रकाशित करण्यात आला आहे. या जीआर नुसार यामध्ये काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात आलेले आहेत. आणि योजना व अटी देखील देण्यात आलेल्या आहेत आता त्याबद्दल सविस्तर माहिती
बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र 2025
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. आणि त्याचाच हा शासन निर्णय असणार आहे जो की महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खणी काम विभाग यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आला आहे.
इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगारांचे त्यासोबतच सेवाशर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा असेल आरोग्य तसेच त्यांच्या करिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996 लागू केला आहे. आता या शासन निर्णयाच्या मार्फत किंवा या योजनेमार्फत बांधकाम कामगारांच्या आरोग्याची सुधारणा असेल किंवा त्यांच्या जीवनमानात सुधारणा असेल अशा अनेक विविध बाबीकडे हे मंडळ लक्ष केंद्रित करणार आहे.
राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी देखील करण्यात येत असते, आणि त्यांनाच या मंडळामार्फत विविध राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना अंतर्गत लाभ मिळवून दिला जातो. यामधीलच सर्वात महत्त्वांच्या लाभापैकी एक असलेला लाभ म्हणजे बांधकाम कामगारांकरिता अत्यावशक संच ज्याला त्या आपल्या भाषेमध्ये भांडी सेट असे देखील म्हणतात.
बांधकाम कामगार इसेन्सिअल किट 2025
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या बांधकाम कामगारांना खालील वस्तू पुरवल्या जाणार आहेत.
- पत्र्याची पेटी
- प्लॅस्टिकची चटई
- धान्य साठवण पंचवीस किलो क्षमता असणारी कोठी
- धान्य साठवण 22 किलो क्षमता असणारी देखील एक कोठी
- बेडशीट
- चादर
- साखर ठेवण्यासाठी एक किलो क्षमता असणारा डबा
- चहा पावडर ठेवण्यासाठी अर्धा किलो क्षमतेचा डबा
- ब्लॅंकेट
- वाटर प्युरिफायर
वरील अत्यावश्यक संच हा फक्त नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांना दिला जातो यासाठी पुरवठ्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकरनिधीतून भागवण्यात यावा असे देखील शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवठा करण्याची कार्यवाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने निश्चित केलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करणे देखील बंधनकारक असणार आहे. तसेच कालावधी वाढविण्यास मान्यता देण्याबाबत चे देखील सर्वस्वी अधिकार हे शासनाकडे असणार असल्याचा देखील हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे बांधकाम कामगारांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
बांधकाम कामगार योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन
या योजनेसाठी तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवकाकडून आणि ठेकेदाराकडून देखील काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि ते सर्व जमा केल्यानंतर तुम्हाला या योजनेमध्ये पात्र केले जाते त्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा तसेच विविध योजनांचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात येते आणि परिणामी तुम्हाला योजनाचा लाभ मिळतो.
Leave a Reply