maha DBT lottery list:-महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी आली,

maha DBT lottery list:-महाडीबीटी पोर्टल वरील कृषी यांत्रिकीकरण योजनेची सोडत यादी 25 जुलै 2025 रोजी काढण्यात आलेली आहे. तर या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, अशा शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करून घ्यावेत. तसेच संबंधित जिल्हा निहाय यादी पाहता येणार आहेत.

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल(mechanization lottery list) द्वारे कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते.

कृषी यांत्रिकीकरण सोडत यादीमध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिलर, कडबा कटर, इत्यादी अनेक कृषी औजारांसाठी लाभार्थ्याची निवड करण्यात येते. महाडीबीटी सोडत यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राची कोटेशन, आणि टेस्ट रिपोर्ट, तसेच ट्रॅक्टरचलित अवजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्तीचे आरसी बुक अपलोड करावे लागते.

त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटी मध्ये आहेत. ट्रॅक्टर चलीत अवजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तींच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे. जर ट्रॅक्टर हे निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने नसेल तर कुटुंबातील सदस्याच्या नावाने असणे आवश्यक आहे. (येथे कुटुंब म्हणजे आई-वडील आणि त्यांचे विवाहित अपत्य).

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *