
Maharashtra agriculture:-राज्य सरकारने एका रुपयात मिळणारी पिक विमा योजना रद्द करून नवीन हप्ता भरावयाची योजना सुरू केली आहे. बोगस शेतकरी योजनेसाठी आग्रिस्टक आयडी आणि पीक पाहणी बंधनकारक केली आहे.
राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना बंद करत नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पीक विमा हप्ता रक्कम भरावी लागणार असून, त्यामुळे बोगस शेतकऱ्यांची संख्या रोखता येईल, अशी अपेक्षा कृषी अधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे.
नवीन पिक विमा योजनेत समावेश केलेल्या पिकांची सुरक्षित रक्कम तसेच हप्ता रक्कम ही कृषी विभागाने जाहीर केली असून, यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै असणार आहे. कृषी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे अग्रिस्टक आयडी करणे बंधनकारक करण्यात आले आहेत. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. महत्वाचे म्हणजे पीक निहाय विमा संरक्षित रक्कम, शेतकऱ्यांचा पीक विमा हप्ता रक्कम जिल्हा निहाय फरक असणार आहे.
कधी मिळेल नुकसान भरपाई?
पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक, रोगांचा प्रादुर्भाव आधी कारणांमुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पन्न हे त्या महसूल मंडळासाठीच्या उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात भरपाई मिळणार आहे.
असे व्हा पिक विमा योजनेत सहभागी
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा, याशिवाय सीएससी केंद्रावरून ही आपले सरकारच्या मदतीने पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. अधिक माहितीसाठी; तसेच नुकसान भरपाई संदर्भात केंद्र सरकारच्या कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन 14447 यावर तसेच स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करता येणार आहे.
पिकांसाठी असा असेल विमा
पिक विमा हप्ता संरक्षित रक्कम
(रुपये प्रति हेक्टरी) (रुपये प्रति हेक्टरी)
- उडीद55 ते 500 22 ते 26600
- ज्वारी63.75 ते 660 25,500 ते 33000
- बाजरी 75 ते 640 26000 ते 32000
- भुईमूग 95.25 ते 900 37000 ते 98 ते 45000
- सोयाबीन 75 ते 1,160 ते 30000 ते 58000
- मुग 55 ते 560 22000 ते 28000
- कापूस 87.50 ते 1800 ते 35000 ते 60000
- मक्का 90 ते 720 26000
- कांदा 170 ते 3,700 ते 6800
- तूर 93.75 ते 940 37218 ते 47000
विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास चाळीस रुपये मानधन केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागाला देण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी हप्त्याच्या रक्कमे व्यतिरिक्त इतर कोणतीही शुल्क सीएससी केंद्र चालकाला देऊ नये.
Leave a Reply